गेल्या आठ दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवाराला लागूनच क्लब रोडवर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखी वृद्धाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. आठ दिवसांनंतरही त्याची अद्याप ओळख पटली नाही. ३ मे रोजी सुमारे ६० वर्षीय अनोळखी वृद्धाला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. ५ फूट ६ इंच उंची, गहू वर्ण, डोक्याला टक्कल असे त्याचे वर्णन आहे. या वृद्धाने आपल्या अंगावर निळे व पांढरे फुल शर्ट व काळी पँट परिधान केली आहे. या वृद्धाविषयी कोणाला माहिती मिळाल्यास ०८३१-२४०५२५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.