हेस्कॉमने ऑनलाईन पेमेंट स्वीकारणे बंद केले असल्याने आता नागरिकांच्या नाके नऊ आले आहे. गुगल पे आणि फोन पे वरून हेस्कॉमने विद्युत बिल भरणे बंद केले असल्याने नागरिकांना आता हेच काम कार्यालयात जाऊन बिल भरण्याची वेळ आली आहे.
गुगल पे आणि फोन पे वरून विद्युत बिल भरत असताना फोन पे जादा पैसे आकारात असल्याने हेस्कॉमने नागरिकांना दिलेली ही सुविधा बंद केली आहे त्यामुळे नोकरदार वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
आधीच कामावरून जाऊन बिल भरणे त्यातच वाहतुकीची कोंडी तसेच उन्हाचा पारा जास्त असल्याने नागरिकांचा संताप तीव्र होत आहे.यातच गुगल पे आणि फोन पे वरून विद्युत बिल भरणे बंद केल्या असल्याने हेस्कॉम कार्यालयाच्या समोर लांबच्या लांब रांगा बिल भरण्याकरिता लागत आहे.
गुगल पे आणि फोन पे वरून बिलाव्यतिरिक्त जादा पाच रुपये आकारण्यात येत असल्याने हे पैसे गुगल पे आणि फोन पे ला तरी का द्यावे याकरिता हेस्कॉमने ही सुविधा बंद केली आहे.
त्यामुळे नागरिकांना बिल भरण्याकरिता फेरफटका मारावा लागू नये याकरिता हेस्कॉमने नवीन पेमेंट मेथड लवकरच सुरू करणार असल्याचे देखील सांगितले आहे.