बीपीएल कार्डधारकांप्रमाणे एपीएल कार्डधारकांना देखील नव्या सरकारच्या मोफत सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
बीपीएल कार्डधारकांना नव्या राज्य सरकारकडून 10 किलो रेशन मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर एपीएल रेशन कार्डधारकांना कुठल्याही सरकारच्या सुविधा मिळत नाही. एपीएल रेशन कार्डधारकांना राज्य व केंद्र सरकारकडून कोणतीही मोफत रेशन मिळत नाही. एपीएल रेशन कार्डधारकांना फक्त नावापुरते कार्ड आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण त्या कार्डचा त्याचा फक्त सरकारी कामात कागदपत्रेसाठी वगळता अन्य कशासाठीच उपयोग होत नाही. अनेक जण खासगी नोकरी असूनही एपीएल रेशन कार्ड आहेत. सरकारी दवाखान्यात फक्त बीपीएल कार्डधारकांना फक्त उपचारासाठी सवलती आहेत. हा एपीएल कार्डधारकांवर अन्याय आहे. तेंव्हा ज्या सुविधा बीपीएल कार्डधारकांना मिळतात त्या इतर कार्डधारकांना मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी एपीएल कार्ड धारकांच्यावतीने केली आहे.