केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बेळगाव जिल्ह्यातील एका तरुणीने यश मिळवले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील अरभाविमठ गावातील श्रुती यरगट्टी या युवतीने यूपीएससी परीक्षेत ३६२ वा क्रमांक मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. श्रुती यरगट्टी एमएस्सी पदवीधारक असून तिने आजपर्यंत पाचवेळा या परीक्षेसाठी प्रयत्न केले असून पाचव्या प्रयत्नात तिला यश मिळाले आहे. या परीक्षेत एकूण ९३३ जण उत्तीर्ण झाले आहेत.
युपीएससीचा निकाल जाहीर झाला असून पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये इशिता किशोर हीनं देशात पहिली रँक मिळवली असून दुसऱ्या क्रमांकावर गरिमा लोहिया तर तिसऱ्या स्थानी उमा हारिथी ही राहिली आहे.