नंदीहळ्ळीतून (ता. बेळगाव) एक जण बेपत्ता झाल्याची नोंद वडगाव पोलीस स्थानकात झाली आहे. भरमाणी जोतिबा टोपकार (वय ५५, रा. कुरबर गल्ली, नंदीहळ्ळी) असे त्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा जोतिबा भरमाणी टोपकार (वय २९) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, २० रोजी रात्री आपले वडील मद्यप्राशन थोडीशी वादावादी झाली. दुसऱ्या दिवशी २१ रोजी सकाळी ७ वाजता घरात कुणालाही काहीही न सांगता ते निघून गेले आहेत. त्यांची उंची ५ फूट असून अंगाने सदृढ, सावळा रंग आहे. त्यांना मराठी भाषा बोलता येते. जाताना त्यांनी पूर्ण बाह्यांचा पांढरा शर्ट व राखट रंगाची हाफ पॅन्ट परिधान केली आहे. या व्यक्तीबाबत कुणाला माहिती मिळाल्यास त्यांनी वडगाव पोलिसांशी संपर्क (०८३१-२४०५२५२ अथवा ९४८०८०४०३१) साधावा, असे आवाहन केले आहे.
नंदीहळ्ळीतून एकजण बेपत्ता
By Akshata Naik

Previous articleमत्तीवडेत उद्या व रेकॉर्ड डान्स स्पर्धा
Next articleया बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष