महानगरपालिकेमध्ये दि. ६ जून रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी हे अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये शहरातील विविध समस्या तसेच इतर योजनांबाबत चर्चा होणार आहे. पाणी, रस्ते व इतर समस्या दूर करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील कामे हाती घेण्यात आली तरी बरीच कामे अर्धवट आहेत. कामांमध्ये गैरप्रकार झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना या बैठकीत धारेवर धरण्याची शक्यता आहे. विविध योजनांमध्ये गैरप्रकार झाले आहेत. याचीही चौकशी केली जाणार आहे. यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे..