बेळगाव दिनांक 11 जून रोजी विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन च्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या 42 किलोमीटर 21 किलोमीटर 10 किलोमीटर , त्याचबरोबर फन रण आणि विकलांगांची मॅरेथॉन ठेवण्यात आली होती मॅरेथॉन उद्घाटनच्या वेळेला फ्लॅग ओपनिंग साठी बेळगावचे एसपी बोरलिंगे सर त्याचबरोबर माजी महापौर नागेश सातेरी सर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी ज्यांनी विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशनला सपोर्ट केला असे बीएस्सी चे ओनर वेद सर मिस्टर जमादार सर आणि रमांना सर यांनी तब्बल अडीच हजार टी-शर्ट दिले. तसेच अनेक नामांकित व्यक्तींनी ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी मदत केली आहे या स्पर्धेच्या वेळी स्पर्धेचे कार्य दर्शक आणि कोच म्हणून उपस्थित असलेले पुण्याचे कर्मचारी वर्ग वसंत गोखले सर , बाळासाहेब कातके ,उमेश थोपटे ,अंकुश गुहे, त्याचबरोबर बेळगावचे लक्ष्मण कोलेकर सर आणि गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेच्या वेळी ज्यांनी ॲम्बुलन्स ला मदत केली ते विजय हॉस्पिटलचे मालक रवी पाटील ,आणि शिवसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेनेचे ॲम्बुलन्स सेवा दिली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी सांगाव चे कल्लाप्पा पाटील यांनी भवानीनगर मंडोळी ग्रामस्थ बेनाळी ग्रामस्थ सावगाव ग्रामस्थ मंडळींनी वॉलेंटरचे काम करून स्पर्धेला सहकार्य केलं या मॅरेथॉन मध्ये 42 किलोमीटरची विजेती कुमारी स्नेहा भोसले हिने प्रथम क्रमांक पटकावला, प्राजक्ता मरगळे येणे दुसरा क्रमांक पटकावला ,21 किलोमीटर मध्ये कू आकांक्षा गणेबैलकर हिने प्रथम क्रमांक पटकावला कु मीनाक्षी बरुकर हिने दुसरा क्रमांक पटकावला त्याचबरोबर 21 किलोमीटर पुरुषांमध्ये कुमार अमोल पंढरपूर याने प्रथम क्रमांक पटकावला सुरेश बळकुडी याने दृतिय क्रमांक पटकावला आकाश देसुरकर तृतीय क्रमांक त्याच बरोबर 10 किलोमीटर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रतीक्षा कुंभार द्वितीय क्रमांक पूजा हालगेकर तृतीय क्रमांक सौंदर्य हलगेकर , मुलांमध्ये 10 किलोमीटर राहुल सूर्यवंशी प्रथम क्रमांक , द्वितीय क्रमांक भूषण गुरव, तृतीय क्रमांक अल्लारक नदाफ . तसेच 35 वयोगटावरील 21 किलोमीटर कल्लाप्पा तिर्विरकर,यांनी मिळवला लेले ग्राउंड वरती विकलांगांसाठी जी स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी रायण्णावर, व्दितीय क्रमांक फकिरा कर्विंकूपा, तृतीय क्रमांक सिधाप्पा पटगुडी यांनी घेतला या सर्व स्पर्धकाना सचिन गोराले बंडू केरवाडकर b s c ऑनर वेद आणि मुजावर सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेला संपन्न करण्यासाठी विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन संघटनेचे अध्यक्ष अनिल देसाई सेक्रेटरी रवी बिरजे, संचालिका राजश्री तुडयेकर, डायरेक्टर दामोदर कंबरकर, विनोद गुरव ,महादेव पाटील, कल्लापा पाटील, राजेश तुडयेकर आधी उपसथितांसमोर ही स्पर्धा संपन्न झाली
मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
By Akshata Naik

Previous articleशहर वासियांना चांगल्या सुविधा पुरवणार -आमदार सेठ
Next article‘हा’ अडथळा कधी दूर होणार?