बेळगाव : गुरुजनांसोबत शाळेच्या माजी विद्यार्थिनी. बेळगाव : महिला विद्यालय प्राथमिक विभागातर्फे माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा रविवारी पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका स्मिता हवालदार उपस्थित होत्या. प्रारंभी प्रार्थना झाली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. दिवंगत गुरुवर्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर कांचन मांजरेकर, पूजा गावडे, निकिता कामुचे, मैथिली कपिलेश्वरकर, स्नेहा यळळूकर, शीतल पाटील, कल्पना बेळगावकर, वर्षा चौगुले, नीता बुलबुले, विशाल अष्टेकर यांनी मनोगते व्यक्त केली. गुरुजनांपैकी स्मिता नवरते, स्वाती कदम, अर्चना जांबोटकर, संपदा बनसूर, शुभांगी पंडित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अंजना राजगोळकर हिने प्रास्ताविक केले. दीप, सन्मानपत्र व फूल देऊन गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. नम्रता भुवनेश्वरी, अंजना, सीमा, स्नेहा व वर्षा यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. निकिता कामुचे हिने आभार मानले.
महिला विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात
By Akshata Naik

Previous articleआमदारांनी अधिकाऱ्यांसोबत केली प्रत्यक्ष पाहणी
Next articleयेळ्ळूरच्या रहिवाशाचा अनगोळ मध्ये खून