जिजामाता गल्ली येळ्ळूर येथील रहिवासी असणारे संजय तुकाराम पाटील वय 34 यांचा अनगोळ तलावा शेजारी शेतवडीमध्ये दगड किंवा एखाद्या हत्याराने प्राणघातात वार करून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेने परिसरात खळबळ माजली असून हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की बुधवारी दुपारी कामानिमित्त संजय घराबाहेर पडला होता तो रात्रीपर्यंत घरी परतलाच नाही त्यानंतर गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह अनगोळ येथील तलावा शेजारी आढळून आला.
त्याच्या डोक्यात दगड किंवा पावडा तसेच अवजड हत्यार यांनी हल्ला केला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. डोक्याला जबर मार लागल्याने संजय चा अतिरक्तस्त्राव झाला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
पूर्ववैमन्यातून दारूच्या नशे मध्ये त्याचा कट काढला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून घेतला आहे.