रोटरी क्लब ऑफ बेळगावचे नूतन अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर यांच्यासह 2023 -24 सालच्या नव्या कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण समारंभ येत्या शुक्रवार दि. 7 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टर येथे आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे व इन्स्टॉलेशन अधिकारी म्हणून जिल्हा रोटरी फाउंडेशनचे चेअरमन माजी प्रांतपाल रो. डाॅ. विनयकुमार पै रायकर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी 2023 -24 सालासाठी क्लबचे नूतन नूतन अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर, सेक्रेटरी मनोज मायकल आणि खजिनदार नितीन गुजर त्यांच्यासह कार्यकारणीच्या नव्या सदस्यांना अधिकार प्रदान केले जाणार आहेत. पुढील वर्षाचे अध्यक्ष सुहास चांडक, उपाध्यक्ष संदीप नाईक, मावळते अध्यक्ष बसवराज विभुती, संयुक्त सचिव मनीषा हेरेकर, खजिनदार नितीन गुजर, संचालक क्लब सेवा मनोज पै, संचालक समाज सेवा तुषार पाटील, संचालक युवजन सेवा विशाल पट्टणशेट्टी, संचालक व्यावसायिक सेवा व जनसंपर्क प्रमुख माजी अध्यक्ष ॲड. सचिन बिच्चू, संचालक आंतरराष्ट्रीय सेवा अशोक परांजपे, मेंबरशिप चेअरमन सुनील काटवे, सतीश धामणकर, कौस्तुभ देसाई आणि माजी अध्यक्ष संजय कुलकर्णी असे नव्या कार्यकारणीचे सदस्य असणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ बेळगावचे नूतन अध्यक्ष म्हणून अधिकार पदाची सूत्रे हाती घेणारे जयदीप सिद्दण्णावर हे गेली 27 वर्षे क्लबचे सदस्य आहेत. बेळगाव बाजारपेठेतील सुप्रसिद्ध व्यापारी असलेल्या सिद्दण्णावर यांनी रोट्रेक्ट क्लबचे अध्यक्ष, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उत्तर कर्नाटक विभागीय चेअरमन म्हणून समर्थपणे कार्य केले आहे. याखेरीज त्यांनी एफकेसीसीआयच्या पर्यटन मंडळाचे आणि बेळगाव रेल्वे स्थानकासाठी नैऋत्य रेल्वेच्या झोनल बोर्डचे सदस्य म्हणून आपले कर्तव्य पार पाडले आहे.