आज दुपारी धामणे रोड येथील तलावात म्हशी चरावयास गेले असता एक म्हैस अचानक मयत झाली आहे.त्यामुळे वडगाव पाटील गल्लीतील शेतकरी रत्नकांत चव्हाण त्यांचे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे .
या शेतकऱ्याची दुभती म्हैस अचानक दगवल्याने त्रास सहन करावा लागत आहे. यांची चरायला नेलेल्या ठिकाणी अचानक म्हैस मरण पावल्याने ते चिंतेत आहेत.
शेतकऱ्यांना मनपा प्रशासन ए पी एम सी किंवा पशू संगोपन खात्याकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.