कोरोनामुळे लोकांचे संपूर्ण राहाणीमान आणि काम करण्याची पद्धत बदलली आहे. ऑफीसमध्ये लोकांना येण्यासाठी परवानगी नसल्यामुळे अनेकांनी वर्कफ्रॉम होम सुरू केलं. आता घरून काम करण्याची संकल्पना बऱ्याच लोकांना पसंत आली आहे. कोरोनाने बरंच काही हिरावून घेतलं असलं काही लोकांसाठी जर काही चांगलं घडलं असेल तर ते म्हणजे वर्क फ्रॉम होम.
वर्क फ्रॉम होम असल्यामुळे लवकर उठण्याची किंवा चांगलं तयार होण्याची चिंता नसते. तसेच लोकांचा ट्रॅव्हलिंगचा मोठा त्रास वाचला आहे. तसेच घरातून काम केल्यामुळे वायफळ खर्च देखील थांबला आहे. त्यामुळे लोकांना आता हे आवडू लागलं आहे.
परंतु जसजस सगळ्या गोष्टी ठिक होऊ लागल्या तसे लोकांना कामावर जावे लागू लागले, परंतु बऱ्याच लोकांना आता कामावर जाणं आवडत नाही आहे. त्यामुळे कायमचे वर्क फ्रॉम होम करू इच्छिणाऱ्या लोकांपैकी तुम्ही असाल तर तुम्हाला आज आम्ही अशा नोकऱ्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही घरबसल्या करु शकता.
Freelancing
जेव्हा जेव्हा घरून काम करण्याचा विचार येतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात फ्रीलान्सिंगचे नाव आपोआप येते. फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुमचा वेळ आणि तुमच्या आवडीनुसार काम करू शकता. म्हणजेच तुम्ही इथे तुमचे बॉस आहात. तुम्ही इथेच काम करण्यापुरते मर्यादित नाही आणि तुम्ही नवीन गोष्टीही करून पाहू शकता. तसेच याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या देशाव्यतिरिक्त तुम्ही परदेशातील काम करु शकता. तुम्हाला फक्त काम दिलेल्या वेळी करायचे आहे.
Social Media Manager
सोशल मीडियावर येणारा कन्टेन्ट आपण नेहमीच पाहात असतो. हे सर्व कन्टेन्ट तुमच्यापर्यंत कशी पोहोचते याचा कधी विचार केला आहे? सोशल मीडिया मॅनेजरच्या नोकरीत तुम्हाला हे सर्व हाताळावे लागते. यामध्ये तुमचे सर्व काम ऑनलाइन करु शकता. या कामात तुम्हाला तुमच्या क्लायंटचा सोशल मीडिया हाताळावा लागेल. हे काम तुम्ही कुठूनही करू शकता
Affiliate Marketer
Affiliate Marketing च्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता. असे घडते की, तुम्ही तुमच्या अनुयायांना काहीतरी खरेदी करण्यास सांगता आणि त्यांनी उत्पादन विकत घेतल्यास तुम्ही त्यातून कमिशन मिळवता. आपल्याकडे वेबसाइट किंवा Instagram खाते असल्यास, आपण उत्पादनाची लिंक प्रविष्ट करू शकता. जर कोणी त्या लिंकवरून खरेदी केली तर त्याचा काही भाग तुम्हालाही मिळेल
Animator
जर तुम्ही अॅनिमेटर असाल आणि चित्रपट, टीव्ही, व्हिडिओ गेम्ससाठी ग्राफिक्स तयार करू शकत असाल, तर तुम्ही घरून हे काम करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या शहरांमधून आणि देशांतील लोकांकडून हे काम मिळवू शकता. तुम्ही तुमच्या कौशल्यानुसार कमाई करू शकता.
Home Baker
जर तुम्हाला केक आणि पेस्ट्री बनवणता येत असेल आणि लोकांना ते आवडत असेल, तर तुम्ही होम बेकर बनू शकता. हे काम सुरुवातीला थोडं अवघड वाटू शकतं, पण जर तुमच्याकडे बेकिंगची कला असेल तर तुम्ही होम बेकर बनले पाहिजे.
Blogger
जर तुमच्याकडे असे विचार असतील जे तुम्हाला जगासोबत शेअर करायचे आहेत. तसंच तुम्हाा खूप सुंदर लिहिता येत असेल तर तुम्ही ब्लॉगर व्हावं. यासाठी तुमच्याकडे वेबसाइट असणे आवश्यक आहे. सुरुवातीला, तुम्ही हे काम ब्लॉगर आणि वर्डप्रेससह देखील सुरू करू शकता. अशा प्रकारे पैसे कमवायला तुम्हाला थोडा वेळ लागेल. परंतु तुम्ही ते करु शकता.
Customer Service Representative
जर तुमच्याकडे बिधास्त बोलण्याची कला असेल तर ग्राहक सेवा प्रतिनिधीपेक्षा चांगली नोकरी तुमच्यासाठी असू शकत नाही. प्रत्येक कंपनीला ग्राहक सेवा प्रतिनिधीची आवश्यकता असते. तुम्ही घरबसल्या तुमच्या कौशल्यातून कमाई करू शकता.
Event Planner
घरामध्ये कोणतेही छोटे ते मोठे फंक्शन असले, तर तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे हॅन्डल करु शकत असाल, तर मग तुम्ही इव्हेंट प्लॅनर बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयाची गरज भासणार नाही, फक्त येणाऱ्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घ्याव्या लागतील आणि त्यानुसार त्यांना जेवण आणि डिझायनिंगचे प्लॅनिंग करुन द्यावं लागेल.
Travel Agent
जर तुम्हाला वासाची आवड असेल आणि तुमचे कुटुंब आणि मित्र कुठेही जाण्यापूर्वी आणि राहण्यापूर्वी तुमचा सल्ला घेत असतील तर तुम्ही ट्रॅव्हल एजंटच्या क्षेत्रात तुमचा हात आजमावू शकता. जर तुम्हाला इंटरनेट नीट समजले असेल तर तुम्ही उत्तम ट्रॅव्हल एजंट बनू शकता.
Film and Post Instructional Videos
तुम्ही कोणत्याही एका गोष्टीत निष्णात असाल तर तुम्ही लोकांना शिकवायलाही सुरुवात करू शकता. समजा तुम्ही छान जेवण बनवता, मग तुम्ही रेसिपीचे व्हिडिओ बनवू शकता आणि ते YouTube, Facebook किंवा Instagram सारख्या प्लॅटफॉर्मवर टाकू शकता. जेव्हा तुम्हाला चांगले व्ह्यूज मिळतात तेव्हा YouTube तुम्हाला पैसे देखील देते. तसेच, अनेक ब्रँड तुमच्याशी सहयोग करू शकतात.
Graphic Designer
कोरोना विषाणूनंतर हळूहळू सर्व काही ऑनलाइन होत आहे. यासाठी प्रत्येकाला वेबसाईट, लोगो आणि जाहिरातींची गरज आहे. तुम्हाला चित्रे आणि शब्दांशी खेळायला आवडत असेल तर तुम्ही ग्राफिक डिझायनर बनू शकता. तुम्ही हा कोर्स केला असेलच असे नाही, तुमच्याकडे कौशल्य असेल तर कंपन्या तुम्हाला काम देतील.
Artist/Crafter
तुमचे घर सजवण्यासाठी तुम्हाला विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू बनवण्याचा आनंद आहे का? या वस्तू विकून तुम्ही चांगली कमाई करू शकता. तुम्ही Etsy सारख्या वेबसाइटवर तुमची नोंदणी करू शकता. तुम्ही तुमचे स्वतःचे इंस्टाग्राम खाते देखील तयार करू शकता.
Instructor
कोरोनानंतर लोकांनी त्यांच्या कौशल्याकडेही लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. लोकांना नवीन गोष्टी शिकायच्या असतात. जर तुम्ही एखाद्या गोष्टीत खूप चांगले असाल तर तुम्ही लोकांना हे सर्व शिकवून पैसे कमवू शकता. जर तुम्हाला गिटार उत्तम वाजवता येत असेल, तर तुम्ही लोकांना ऑनलाइन गिटार वाजवायला शिकवू शकता आणि पैसेही कमवू शकता.