No menu items!
Tuesday, July 1, 2025

‘कॉन्व्हेंट शाळांचा विरोध टिकलीला कि हिंदु धर्माला?’

Must read

कॉन्व्हेंट शाळांऐवजी चांगल्या संस्काराचे शिक्षण देणारी विद्यालये निवडा !

  • गौरी द्विवेदी, मुख्याध्यापिका, रुद्रप्रयाग विद्यामंदिर
    कॉन्व्हेंट शाळांमध्ये विशिष्ट अटी ठेवून शिक्षण दिले जाते; मात्र कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिक्षण घेणारी बहुतांश मुले ही हिंदू असतात. कॉन्व्हेंट शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे हिंदू असल्याने हिंदु संस्कृतीचा अंतर्भाव असलेले शिक्षण देण्याची ही व्यवस्था हवी आणि यामध्ये भेदभाव झाल्यास हिंदू मुलांच्या पालकांच्या समूहाने त्या शाळेच्या प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकलेले विद्यार्थी हिंदु संस्कृतीपासून दूर जात आहेत. ‘इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेला विद्यार्थीच यशस्वी होईल’, या गैरसमजातून पालकांनी आता बाहेर आले पाहिजे. ‘विद्यार्थी संस्कारी झाल्यावरच यशस्वी होईल’, हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच संस्काराचे शिक्षण देणारी विद्यालये आपल्या मुलांसाठी निवडा, असे आवाहन प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील ‘रुद्रप्रयाग विद्यामंदिरा’च्या मुख्याध्यापिका गौरी द्विवेदी यांनी केले. त्या हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कॉन्व्हेंट शाळांचा विरोध टिकलीला कि हिंदु धर्माला?’ या विषयावर आयोजित विशेष संवादात बोलत होत्या.

कॉन्व्हेंट शाळांचा ‘अल्पसंख्याक’ हा दर्जा काढा !
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पुणे येथील समन्वयक श्री. नागेश जोशी म्हणाले की, झारखंड येथील कॉन्व्हेंट शाळेत कपाळावर टिकली लावली म्हणून शिक्षिकेने थोबाडीत मारली. या अपमानामुळे उषा कुमारी या हिंदू विद्यार्थीनीने आत्महत्या केली. हे छळाचे पहिले उदाहरण नसून यापूर्वी देशभरात ठिकठिकाणी कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांसोबत असे प्रकार घडले आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर हिंदू विद्यार्थ्यांना शाळांमधून आपल्या हिंदु धर्माचे शिक्षण देणे आरंभ करायला हवे होते; मात्र असे झाले नाही. आज अनेक कॉन्व्हेंट शाळांमधून केवळ ख्रिस्ती पंथाचे शिक्षण दिले जाते. हिंदु धर्मावर टीका केली जाते. या कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदू विद्यार्थ्यांचा धर्मांतराचा प्रयत्न केला जात असून कॉन्व्हेंट शाळा ही हिंदूंच्या धर्मांतराची केंद्रे होत आहेत. बहुतांश कॉन्व्हेंट शाळांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक हिंदू विद्यार्थी शिकतात. त्यामुळे कॉन्व्हेंट शाळांचा ‘अल्पसंख्याक दर्जा’ सरकारने काढून घेतला पाहिजे.
धोरी, झारखंड येथील ‘कस्तुरबा विद्यानिकेतन’च्या संयुक्त अध्यक्ष डॉ. पूजा म्हणाल्या की, कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकलेले विद्यार्थी विदेशी संस्कृतीचे अनुकरण करतात. कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकणारी मुले निराशेला बळी पडत आहेत, असे आढळून आले आहे. कॉन्व्हेंट शाळांमध्ये जाणारी मुले आपली भारतीय संस्कृती विसरतात; याउलट सनातन हिंदु धर्माचे शिक्षण आणि आचरण केलेली मुले आत्मबळाने युक्त असतात. अशी मुले निराशेची शिकार होत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. कॉन्व्हेंट व्यतिरिक्त अनेक शाळांमध्ये इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे शिकवली जाते. आमच्या देशभरातील विद्याभारती शाळांमध्ये हा प्रयत्न सुरू आहे.

आपला नम्र,
श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क : 99879 66666)

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!