श्री एकदंत युवक मंडळ समर्थ नगर व डॉ प्रकाश राजगोळकर यांच्या संयुक्त विद्यमाने गेले 12 वर्ष सलग आयोजीत डेंग्यू आणी चिकूणगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम करण्यात येते यासाठी श्री एकदंत युवक मंडळाचे कार्यकर्ते तसेच डॉक्टर प्रकाश राजगोळकर यांनी विशेष प्रयन्त करत असतात .
या लसीकरणाच्या आधी या रोगावर घ्यावयाच्या दक्षता याच्यावर डॉक्टर प्रकाश राजगोळकर यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले नंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे, पुजन करून श्री फळ वाढविण्यात आले यानंतर श्री एकदंत युवक मंडळाकडून डॉक्टर प्रकाश राजगोळकर याचा शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांनी वेगवेगळे आरोग्य शिबीर समर्थ नगर मालिकार्जुन नगर या नागरिकांसाठी करत असतात त्यासाठी त्याचे श्री एकदंत युवक मंडळ करून आभार मानण्यात आले व पुढे असेच कार्य आपल्या हातून घडावे असे शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी भरतेश कॉलेज चे विद्यार्थी,समर्थ नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व भरपूर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरणाच्या लाभ घेतला.