No menu items!
Tuesday, July 1, 2025

जीवनात कधीही हार मानू नका जिद्दीने लढून यशस्वी व्हा : शिक्षणतज्ञ रामू अ. गुगवाड

Must read

‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’;डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाबद्दलचे विचार अतिशय प्रगल्भ आहेत ते विचार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उतरवले गेले पाहिजेत हेच विचार आपल्या जीवनाला नवी दिशा देऊन यशस्वी करतात. ‘शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे. मुलांना आणि मुलींना ही ज्ञानगंगा उपलब्ध करुन देणं हे एखाद्या विषयावर आपण मोर्चा काढण्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च विद्याविभूषित होते. शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे असं ते नेहमी म्हणायचे. शिक्षणासारखा दुसरा सर्वोत्तम गुरू नाही या मतावर बाबासाहेब ठाम होते. एखाद्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.
शिक्षण हा जीवनातील प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास करून समाजाचे निष्ठावान नेते बनले पाहिजे.
प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार हा सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत मूळ पाया आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आत्मविश्वास बाळगा, कधीही हार मानू नका, ही आपल्या जीवनाची पाच तत्त्वे आहेत आपल्या जीवनात उतरवून यशाच्या शिखरावर जाण्यासाठी अथक खडतर प्रयत्न करा यश नक्कीच तुमच्या पाठीमागून धावून येते. कोणत्याही यशाला शॉर्टकट नाही त्यासाठी अविरत खडतर प्रयत्न करा. भारतासह जगभरातील अनेक दिग्गज यशस्वी व्यक्तींनी आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेऊन यशाचे शिखर गाठले कोणतेही माध्यम हे कमीपणाचे नसते आपलं कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी कोणताही भेदभाव न करता ज्ञान मिळवण्याची साधने जितकी पूरक आपल्याला मिळतील तितके अधिक आपण ज्ञानी संपन्न होऊ. कोणताही भाषा धर्म जात पंत संस्कृती यांचा भेदभाव न करता आपण एक माणूस म्हणून प्रत्येकांच्याकडे पाहिले गेले पाहिजेत आणि जगण्याचा अधिकार प्रत्येकाला प्राप्त करून दिला गेला पाहिजे असे प्रतिपादन प्रमुख वक्ते आणि शिक्षण तज्ञ कर्नाटक राज्य प्रौढशाळा सहाय्यकशिक्षक संघाचे प्रधान कार्यदर्शी आणि समाजसेवक श्री रामू अ. गुगवाड ( बेळगांव ) यांनी केले.

कर्नाटक राज्य प्रौढशाळा सहशिक्षक संघ बेंगलोर राज्यस्तरीय प्रतिभा पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा तसेच गुणगौरव सोहळा आणि त्यानिमित्त विशेष व्याख्यानाच्या आयोजन बेंगलोर दक्षिण जिल्ह्यातील चौथा नंबर गटशिक्षणाधिकारी व्याप्ती मधील के.आर. पुरमच्या एच.ए. एल. सभागृहात एसएससी आणि पीयूसी द्वितीय वर्षात परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 2023 साला मधील विद्यार्थ्यांना विशेष सन्मान आणि आदर्श शिक्षक तसेच आदर्श शाळांचा गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजन केला होता. त्यामध्ये राज्यातील 625 पैकी 625 गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि राज्यातील शंभर टक्के निकाल लागलेल्या प्रत्येक विषयांमधील शिक्षकांचा आणि शाळेचा विशेष सन्मान करण्यात आला.

कर्नाटक राज्यातील विविध शाळांच्या मधील वेगवेगळ्या स्तरांमधील राज्य जिल्हा तालुका आणि केंद्र पातळीवरील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आणि 100 पैकी 100 गुण मिळवलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार हा बहुमान देऊन गौरव सोहळा नुकताच बेंगलोर येथील के आर पुरम एच ए एल सभागृहात हा कार्यक्रम सोहळा अतिशय मोठ्या थाटात पार पडला. वेगवेगळ्या शाळांच्या मधील विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य प्रौढशाळा सहशिक्षक संघा बेंगलोरचे अध्यक्ष श्री पालाक्षी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संवर्धन करण्याकरिता संदेश देण्यात आला आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या कर्नाटक विधान परिषद माजी उपसभापती श्री. पुट्टांन्ना, प्रमुख वक्ते आणि शिक्षण तज्ञ कर्नाटक राज्य प्रौढशाळा सहाय्यकशिक्षक संघाचे प्रधान कार्यदर्शी आणि समाजसेवक श्री रामू अ. गुगवाड, समाजसेवक युवानेते रामोजी गौडा, समाजसेवक आणि सचिव अशोक खोत, प्रा. निलेश शिंदे, अध्यक्ष सिद्धबसाप्पा , उपाध्यक्ष एम के बिरादार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले फोटो पूजन खजिनदार धनसिंग राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. शारदा माता फोटो पूजन संघटना कार्यदर्शी तुकाराम भागेनावर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर फोटो पूजन सहकार्यदर्शी देवराज गौडा यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज फोटो पूजन जिल्हा कार्यदर्शी नागराज यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आदर्श शिक्षक आणि यशस्वी उत्तम शाळांचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध सर्व मान्यवरांची भाषणे झाली.

यावेळी राज्यभरातील विद्यार्थी शिक्षक पालक आणि संघटनेचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!