मानव कल्याण आणि सकस समाजनिर्मितीसाठी आपले राजसिंहासन पणाला लावून समाज बदलण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले. प्रजाहितासाठी त्यांनी राजा म्हणून आपले व्यक्तिमत्त्व बाजूला ठेवून समाजातील प्रत्येकाला समान दर्जा, जातीअंत झाल्यास समाज समान पातळीवर येईल, हेच धोरण राबविले होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित करून सत्ता आणि संपत्तीचा वापर जनतेच्या उन्नतीसाठीच केला. त्यामुळे आज स्वातंत्र्याची पंच्चाहत्तरी आणि अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतल्यानंतर शाहूंचे कार्य अधिक प्रभावीपणे जाणवते. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’हे ब्रीद प्रत्यक्षात राबवत राजर्षी शाहूंनी सामाजिक समतेपासून उद्योग उभारणीपर्यंत, स्त्री उद्धारापासून कृषिक्रांतीपर्यंत अनेक क्षेत्रांत अतुलनीय योगदान दिले. ३ एप्रिल १८९४ ते ६ मे १९२२ या २८ वर्षांच्या त्यांच्या राज्यकारभाराची कारकीर्द इतिहासाला कलाटणी देणारीच होती. वयाच्या विसाव्या वर्षी अंत्यत बिकट परिस्थितीत त्यांनी राज्यसूत्रे हाती घेतली. सामान्य जनतेची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठीच त्यांनी राज्यकारभार केला. शिक्षण, प्रशासन, कला, क्रीडा, शेती, उद्योग, आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. भारतात त्यावेळी असलेल्या ७०० संस्थानिकांत राजर्षी शाहू महाराजांनी केलेली क्रांती ही आज देशाला त्याच नियमावर व कायद्यावर पुढे जाण्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. सर्वसामान्य जनतेचे कैवारी- सामाजिक क्रांती घडवून आणणारा क्रांतिवीर आणि समता, बंधुता यांची शिकवण देणारे राजश्री शाहू महाराज सामाजिक क्रांती घडवून आणणारे एक मोठे बहु आयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा इतिहास लौकिक आहे त्यांचे विचार आणि दृष्टीकोन आजच्या पिढीने घेणे अत्यंत आवश्यक आहेत. आरक्षणाचे जनक , सक्तीचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, आरक्षण, समता, आणि बंधुता अशा विविध गोष्टींसाठी त्यांना आठवले जाते.
पण अनेकांना शाहू महाराज यांच्याविषयी पुरेसे माहिती नाही. राजश्री छत्रपती शाहू महाराज आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपये दंड ठोटावणारा राजा, कला, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा, अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा, सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा म्हणून सर्वांनाच परिचित आहे.महाराजांची शतक सुवर्णा महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. स. १८८५ मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम. क्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल १८९१ रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला. शिक्षणक्रम संपल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांनी केलेले कार्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी सहकार्य केले. चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. २६ जुन हा शाहु महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासुन”सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे. शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यांत मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला, वाघ्या-मुरळी प्रतिबंधक कायदा केला. स्त्री पुनर्विवाह कायदा केला. आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले. कोल्हापूर येथे “शाहपूरी” ही गुळाची बाजारपेठ सुरु केली. शाहूंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वस्तीगृहे सुरु केली. अस्पृश्यांसाठी “मिस क्लार्क” हे वस्तीगृह स्थापन केले.१५ टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ अशा शब्दांत त्यांना गौरविलेले आहे.
शाहूजींना आधुनिक आरक्षणाचे जनक म्हटले जाते. पुढे बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांनी भारतीय संविधानात शाहूजींनी लागू केलेल्या आरक्षणाचा विस्तार केला. आधुनिक भारतातील जातीवर आधारित हे पहिले आरक्षण होते. त्याचप्रमाणे
महाराजांनी हिंदू वारसा हक्काचा निर्बंधावर मोठा निर्णय घेतला. शूद्रांची अनौरस संतती आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रिवर्णांची अनौरस संतती यांच्या वारसाहक्कातील तफावत महाराजांनी नष्ट केली. महाराजांनी केलेले कार्य : शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांचे वृत्तपत्र मूकनायकला सहकार्य केले. शाहू महाराजांना सामाजिक कार्य करणारा राजा असं म्हटलं जाते. त्यांनी समाजातील अनेक रुढी, परंपरा नष्ट केल्या. यामुळे राज्य सरकार शाहू महाराजांचा जन्म दिवस हा 2006 पासून ”सामाजिक न्याय दिन”
म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. वाघ्या-मुरळी प्रतिबंधक कायदा, स्त्री पुनर्विवाह कायदा, आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा करत त्यांनी समाजात मोठा बदल घडवून आणून परिवर्तन समाजात केले. असे प्रतिपादन कवी प्रा. निलेश शिंदे यांनी “”शाहू महाराज जीवनकार्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्व एक चिंतन”” या विषयावर विशेष असे मार्गदर्शन केले
भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा शाखा, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव, अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य बहुउद्देशीय परिषद आणि एल्गार परिषद बेळगाव, शाहू फुले आंबेडकर सोशल फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराजांची शतकसुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा त्यानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते; याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बेळगांव येथील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा. के. डी. मंत्रेशी आणि साहित्यिक कवी प्रा. निलेश शिंदे बेळगांव यांनी “”शाहू महाराज जीवनकार्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्व एक चिंतन”” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन सदाशिवनगर बेळगांव येथील बुद्ध विहार आंबेडकर भवन या ठिकाणी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष समाजसेवक यमनाप्पा पी. गडीनाईक उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते निंगाप्पा विठ्ठल जाधव , समितीचे नेते आणि माजी नगरसेवक अनिल पाटील , रमाकांत मेत्री यांनी फोटो पूजन केले.
दीप प्रज्वलन सेक्रेटरी राजेंद्र कांबळे, प्रमुख वक्ते प्रा. के.डी. मंत्रेशी, प्रा. निलेश शिंदे, जीवन कुरणे, समितीचे कार्यकर्ते नारायण सांगावकर , सुधिर चौगुले, महादेव तळवार, लक्ष्मण नाईक, मल्लिकार्जुन राशिंगे, अनंत कोलकार यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विद्यानिकेतन शाळेचे शिक्षक सहदेव कांबळे यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित गीत गायन केले. यावेळी माजी नगरसेवक अनिल पाटील, एपीएमसी चे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, प्रा. के. डी. मंत्रेशी, प्रा निलेश शिंदे यांनी वेगवेगळ्या शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित जीवन पटावर आधारित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विद्यानिकेतन शाळेचे शिक्षक सहदेव कांबळे यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित गीत गायन केले.
यावेळी माजी नगरसेवक अनिल पाटील, एपीएमसी चे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, प्रा. के. डी. मंत्रेशी, प्रा निलेश शिंदे यांनी वेगवेगळ्या शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित जीवन पटावर आधारित मार्गदर्शन केले.
स्वागत नारायण सांगावकर यांनी केले. प्रस्ताविक शाहू – फुले-आंबेडकर सोशल फाउंडेशनचे सचिव भीमा कांबळे यांनी केले. परिचय नागेंद्र कांबळे यांनी करुन दिला. आनंद कोडसंगी, गंगाराम अंकलगी, लक्ष्मण नाईक, महादेव तलवार सिद्धाप्पा कोलकर, अनंत कोलकर, , एम आर शेट्टी, चांगदेव हुवाप्पणावर,
मरप्पा हुवाप्पणावर, जोतिबा निंगाप्पा पाटील, अजित पाटील, श्रीधर पाटील,सिद्धाप्पा कांबळे,
विजय पाटील, उदय पाटील, नारायण पाटील, सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे व जीवन कुरणे यांनी केले. तर सागर गुंजीकर यांनी आभार मानले. तसेच यावेळी वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.