No menu items!
Friday, December 6, 2024

‘ व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे गैरप्रकार टाळा -हिंदुजनजागृती समिती

Must read

बेळगाव :

गेल्या काही वर्षांत 14 फेब्रुवारी हा दिवस ‘ व्हॅलेंटाईन डे ‘ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे . पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे . त्यामुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी आणावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे .

‘ व्हॅलेंटाईन डे ‘ च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत . तसेच , यादिवशी होणाऱ्या पाट्यांमधून युवक – युवती यांच्यात मद्यपान , धूम्रपान , अंमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झाली आहे . त्यामुळे या सर्व प्रकाराला आळा घालण्यात यावा अशी मागणी देखील जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे

व्हॅलेंटाईन डे दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात . काही धर्मांध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना ‘ लव्ह जिहाद’चा बळी बनवतात . थोडक्यात ‘ व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा – महाविद्यालयाच्या परिसरातील कायदा – सुव्यवस्था , तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे .. या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध आध्यात्मिक आणि समाजसेवी संघटना या ‘ डे संस्कृती’ला विरोध करत भारतीय प्रथांचे पालन करण्यासाठी आवाहन करत आहेत .

14 फेब्रुवारी या दिवशी पोलिसांची विशेष पथके गस्ती पथके नियुक्त करून महाविद्यालय परिसरात अपप्रकार करणाऱ्या समाजकंटकांना ताब्यात घेणे , वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करणे आदी उपाययोजना कराव्यात . तसेच ‘ व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण पाहता शाळा – महाविद्यालयाच्या परिसरात असे प्रकार होऊ नयेत , यासाठी ‘ मार्गदर्शक सूचना ‘ निर्देशित करण्यात याव्यात .अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!