No menu items!
Thursday, December 5, 2024

पिडिओंचा मनमानी कारभार

Must read

बेंनकनहळ्ळी येथील पी डी ओ सुजाता यांनी बेकायदेशीररित्या कोणतीही पूर्वसूचना न देता सरस्वती नगर पाईपलाईन रोड गणेशपुर येथील प्रताप सिंह कृष्णाजी मोहिते यांच्या मालकीचा प्लॉट ताब्यात घेतला आहे. येथील प्लॉटवर त्यांनी जेसीबी चढवून येथील शेडची नासधूस केली तसेच जमीन बळकविण्याचा प्रयत्न केला आहे .त्यामुळे मोहिते कुटुंबीय उघड्यावर पडले असून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रताप सिंह कृष्णाजी मोहिते यांच्या मालकीचा प्लॉट गणेशपुर नगर पाईपलाईन रोड सरस्वती नगर येथे आहे. येथे रस्त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे मात्र ती जागा सोडून बेकायदेशीर प्लॉटमधून गटारी करण्याचा घाट ग्रामपंचायत सदस्यांनी आणि पीडीओ नी घातला आहे .याबाबत जमीन मालकाने अनेक वेळा नोटीस देऊन देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोहिते कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!