द. म. शिक्षण मंडळाच्या भाऊराव काकतकर (बी.के.) महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे ज्येष्ठ हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.
बी. के. महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख प्रा. नीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या जयंती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील उपस्थित होते. प्रारंभी प्रा. ताटे यांनी उपस्थित आमचे स्वागत केल्यानंतर प्राचार्य डाॅ. पाटील यांच्या हस्ते मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
हिंदी साहित्यातील जेष्ठ कहानीकार, कादंबरीकार म्हणून मुन्शी प्रेमचंद्र ओळखले जातात. साहित्याच्या माध्यमातून समाजातील वाईट प्रवृत्तींवर, अंधरुढी -परंपरांवर प्रहार करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या कथानकामध्ये वेगळेपण जाणवते. त्यांचे साहित्य जगायला शिकवते. जीवनाचा मार्ग दाखवते, असे विचार यावेळी बोलताना प्राचार्य डाॅ. एस. एन. पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी प्रा. अमित चिगळी यांनी सर्वांचे आभार मानले.