हलगा येथील सागर संभाजी संताजी यांनी प्रबंध सादर केल्यामुळे त्यांना विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातर्फे पीएचडी ही मानाची पदवी देण्यात आली. मंगळवार दिनांक १ रोजी कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते त्यांना पीएचडी ही पदवी देऊन गौरविण्यात आले.सागर संभाजी संताजी हे केएलएस गोगटे तांत्रिक महाविद्यालय प्राध्यापक म्हणून कार्य करत असतात.प्राध्यापक सागर संताजी यांनी ऑटोमॅटिक स्लिप स्टेज क्लासिफिकेशन बेसड ऑन ईईजी सिग्नल अनालिसिस टू आयडेंटिफाय स्लीप इनसोमीनिया हा प्रबंध सादर केला,यामुळे त्यांना पीएचडी ही पदवी देण्यात आली. प्राध्यापक सागर संताजी यांना केएलएस गोगoटे तांत्रिक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विना देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ सागर संताजी हे हलगा येथील संभाजी संताजी यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यांना मिळाली पीएचडी पदवी
By Akshata Naik
Must read
Previous articleबी. के. महाविद्यालयात मुन्शी प्रेमचंद जयंती साजरी