शाहूनगर लास्ट बस स्टॉप येथे विठ्ठलाई गल्ली कॉलनीत वार्ड नंबर 33 , मध्ये 24 तास पाण्याची पाईपलाईन घालण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनी उपमहापौर यांच्याकडे विनंती केली होती तेव्हा उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील यांनी एल अँड टी आणि कर्नाटक वॉटर बोर्ड चे अधिकारी यांना बोलून तिथल्या नागरिकांची पाण्याची समस्या सर्वे करून दूर करण्यासाठी सांगितले .
येथील काही ठिकाणी विहिरी आहेत पण नाल्याचे पाणी त्याच्यामध्ये मिक्स होऊन पिण्याच्या व वापरण्यासाठी लोकांना त्रासदायक होत आहे.त्यामुळे उपमहापौर यांना ही विनंती करण्यात आली होती .
यावेळी शंकर चोरगे ,रवी बागी, शिव प्रसाद तलवार, प्रदीप शेट्टी, जयंत चोरगे, शालू तलवार, समाजसेवक प्रवीण पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते