बेळगाव जेष्ठ नागरिक संघटना यांच्यावतीने अनगोळ येथील मराठी मुला मुलींची हायर प्रायमरी शाळा नंबर ६ येथे वनमहोत्सव कार्यक्रम मंगळवारी दिनांक १ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. आवड असेल तर नक्की सवड मिळते या म्हणीप्रमाणे बेळगाव जेष्ठ नागरिक संघातील सदस्य आपली सेवा वेगवेगळ्या खात्यामध्ये बजावून निवृत्त झाले आहेत.आपल्या निवृत्ती जीवनाचा आनंद ते मनसोक्तपणे लुटत असताना समज कार्य ही करत आहेत याच संघाच्या वतीने अनगोळ येथील मराठी मुला मुलींची शाळा नंबर ६ येथे वनमहोत्सव कार्यक्रम साजरा करून हा सण साजरा का करतात? झाडाचे फायदे तसेच औषधी वनस्पतीचे फायदे काय आहेत याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत कडीपत्ता दालचीन पेरू निलगिरी अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे शाळेच्या आवारात लावण्यात आली.
जेष्ठ नागरिक सेक्रेटरी श्री सुरेंद्र देसाई सर यानी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले त्यांनी प्राध्यापक म्हणून आपली सेवा बजावून आता समाजसेवेचे कार्य हाती घेतले आहे. तसेच संघाचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच शाळेसाठी व विद्यार्थांसाठी आम्ही शक्यतो मदत करू असे आश्वासन दिले विठ्ठल देसाई व सदाशिव कुलकर्णी यांना आपले बालपणाचे दीवस आठवले त्यांनी आपल्या भाषणात आपले अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना अभ्यास किती महत्वाचा आहे याची जाणीव करून दिली
यावेळी शाळेच्या जेष्ठ शिक्षिका जयश्री पाटील यांनी वनमहोत्सवाचे महत्त्व तसेच त्याची गरज याबद्दल माहिती दिली व ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांचे
स्वागत केले कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक विश्वास धुराजी सेक्रेटरी सुरेंद्र देसाई गुरुनाथ शिंदे सदाशिव कुलकर्णी सुरेश खर्डे विठ्ठल पोळ विठ्ठल देसाई विजय वाईंगडे शोभा पांडे मंगला पाटील प्रकाश कोकीतकर
यावेळी श्री सुरेश खर्डे सर यांनी ह्या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले आणि मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. नंतर कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किरण कदम सर यांनी शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले यावेळी जयश्री पाटील सविता निंगण्णावर भुवना मनतुर्गिमठ्ठ रामलिंग बाबर सुरेखा पाटील तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
मराठी मुला मुलींची शाळा नंबर ६ येथे जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने वनमहोत्सव साजरा
