महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल एडवोकेट सुधीर चव्हाण यांचा सत्कार रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते करण्यात आला सुधीर चव्हाण यांनी आजवर समितीच्या प्रत्येक लढ्यात आपली कायदेशीर भूमिका चोक पणे बजावली आहे शेतकऱ्यांचा प्रश्न असो सामान्य जनतेचा प्रश्न असो कौटुंबिक प्रश्न असो किंवा न्यायालयीन कामकाजावरती त्यांचा एक हसत खेळत मनमिळाऊ स्वभाव व कायद्यावरती पूर्णपणे आपला अभ्यास व अनुभव त्यातून आजवर त्यांनी आपलं कार्य या मराठी जनतेला एक सेवाभावी म्हणून दिलेली आहे. समारंभ प्रसंगी रणजीत चव्हाण पाटील ,विकास कलघडगी ,महादेव पाटील, सागर पाटील ,प्रा आनंद आपटेकर ,जयवंत काक्तीकर, सागर देशपांडे, रितेश भोंगाळे उपस्थित होते.
बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
