देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिन बेळगाव जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष ॲड सुधीर बी चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश श्रीमती विजयालक्ष्मी देवी उपस्थित होत्या.
प्रारंभी बार असोसिएशन सेक्रेटरी वकील गिरीराज पाटील जॉइंट सेक्रेटरी ॲड बंटी कपाई वकील महांतेश पाटील वकील आदर्श पाटील ॲड प्रभाकर पवार वकील पूजा पाटील यांच्या वतीने महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जिल्हा प्रधान न्यायाधीश लक्ष्मीदेवी यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे पूजन करण्यात आले याप्रसंगी बेळगाव जिल्हा न्यायालय सर्व माननीय न्यायाधीश बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी वकील मंडळी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.