काल भारताचे चंद्रयान -3 यशस्वी झाल्यानिमित्त आज गुरुवार दिनांक 24/08/2023 रोजी मराठी शाळा बेनकनहळळी येथे जागतिक किर्तीचे प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक दिनकर मष्णू साळुंखे यांचा सत्कार समारंभ पार पडला. हिंडलगा गावचे सुपूत्र असलेल्या, सरांचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळा हिंडलगा येथे हायस्कुल शिक्षण सेंट्रल हायस्कुल बेळगाव तसेच BSc,MSc, KUD धारवाड येथे PhD ही पदवी IISc Bangalore येथून घेऊन सद्या शास्त्रज्ञ म्हणून वयाच्या 68 व्या वर्षी ही कार्यरत आहेत. ही ओळख विद्यार्थाना करून देण्यात आली.
यावेळी शास्त्रज्ञ श्री. दिनकर साळुंखे तसेच निवृत्त माजी मुख्याध्यापक श्री. प्रकाश बेळगुंदकर यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी शास्त्रज्ञ श्री. दिनकर साळुंखे म्हणाले आजच्या युवा पिढीला पुर्वीपेक्षा जास्त सोई सुविधा मिळत आहेत. तसेच गुगल, You tube, Internet च्या माध्यमातून जग जवळ आले आहे. याचा फायदा विधार्थानी उठवून भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थानी शास्त्रज्ञ व्हावे असे ते म्हणाले. शिवाय शाळेत विद्यार्थाना कायमस्वरूपी आणि पक्की माहिती मिळावी या उद्देशाने डिजिटल बॅनर बनवून फोटो सहित माहिती मिळेलं असे शास्त्रज्ञांचे, लेखकांचे, पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या बॅनर चे सुद्धा कौतुक केले. तसेच शास्त्रज्ञांच्या पंक्तीत स्वतः चा फोटो पाहून ते भावुक झाले
यावेळी त्यांनी चांदयान-3 विषयी आपुले अनुभव कथन केले. तसेच भारत देश सर्वच क्षेत्रात आर्थिक महासत्ता बनत चालला आहे असे सांगीतले. स्वातंत्र्यानंतर केवळ 75 वर्षातील ही कामगिरी म्हणजे भारतातील कौशल्य किती विकसित आहे याचे दाखले त्यांनी दिले.
यावेळी प्रमुख वक्ते श्री. प्रकाश बेळगुंदकर सर यांनी शास्त्रज्ञांचा परिचय करून दिला. तसेच भावी पिढीने विज्ञाननिष्ठ राहुन ISRO सारख्या संस्थांना जॉईन करावे असे सुचविले
तसेच मराठी शाळा बेनकनहळळीत चाललेल्या उपक्रमशील शिक्षणाचे आणि ते राबविणाऱ्या शिक्षकांचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले. अशा आदर्श शिक्षक आणि शाळांची गावागावात गरज आहे. असे ते म्हणाले.
याप्रसंगी विद्यार्थानी चांद्रयान-3 चे प्रतिकात्मक मॉडेल अवकाशात उडवून शास्त्रज्ञांचे स्वागत केले. देशभक्तीपर गीत गाऊन सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्यात आला. सत्कारप्रसंगी हिंडलगा सी आर पी श्री. सतीश पाटील SDMC अध्यक्ष श्री. कलाप्पा पाटील व सदस्य
श्री.आनंद चौगुले, श्री. बाळू जाधव, शिवराज हायस्कुल मुखाध्यापक श्री. पी. आर. पाटील तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सौ. एस.एम. बंकापुर, – सौ. जी आर इनामदार, श्री. एम.बी. बागवान श्री. एस आय. पाटील, श्री. एम एन. पाटील सौ रोहिणी देसुरकर व संपूर्ण शिक्षक वर्ग उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. ईश्वर पाटील यांनी केले. तसेच अभिप्राय आणि आभार प्रदर्शन श्री. एच.के. बाळेकुंद्रीकर यांनी मांडले.