जिल्हास्तरीय ऑफिशियल कराटे निवड चाचणीमध्ये सृष्टी जाधव हिची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. यावेळी 18 ते 21 वर्षाखालील गटामध्ये भाग घेऊन सृष्टी जाधवने सुवर्णपदक पटकाविले. श्री गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तिला कराटे प्रशिक्षक दीपक काकतीकर, अमित वेसणे यांचे प्रशिक्षण लाभत आहे. 30 सप्टेंबर रोजी हुबळी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सृष्टी प्रतिनिधित्व करणार आहे. गोगटे कॉलेज ऑफ बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन ची विद्यार्थिनी आहे. सृष्टी जाधव ही समाजसेविका माधुरी जाधव यांची कन्या आहे.