रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी कै. एल आर पाटील यांच्या स्मरणार्थ गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात झालेल्या मराठा युवक संघाच्या आंतरराज्य, शालेय व विद्यापीठ जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. मुलांच्या गटात सेंट पॉल स्कूलने 73 गुण मिळवून तसेच मुलींच्या गटात ज्ञान प्रबोधन मंदिर व सेंट जोसेफ स्कूलने 39 समसमान गुण मिळवून चॅम्पियन ट्रॉफी मिळवली तसेच मुलांच्या गटातील रोलिंग ट्रॉफी सेंट झेवियर स्कूलने पटकाविले .रात्री वेळ पर्यंत चाललेल्या या अत्यंत चुरशीच्या स्पर्धांच्या बक्षीस समारंभाला उपस्थित नवनिर्वाचित मार्कंडेय शुगर फॅक्टरी चे श्री सुनील अष्टेकर यांचा मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ट्रॉफी सेंट पॉल्स स्कूलच्या संघाला देण्यात आली , मुलींच्या गटाची चॅम्पियन ट्रॉफी मराठा युवक संघाचे सेक्रेटरी श्री चंद्रकांत गुंदकल व कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी यांनी दिली. मुलांच्या गटाची रनर्स अप ट्रॉफी सेंट झेवियर्स स्कूलला शेखर हांडे व नेताजी जाधव यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी स्टेजवर उद्योजक श्रीकांत देसाई,दीपक गायकवाड आबा क्लबचे अध्यक्ष श्री शितल हुलबत्ते, एन आय एस जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार व इतर मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळीपासून चालू असलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विकास कलघटगी यांनी सर्वांचे आभार मानले.
सविस्तर रिझल्ट पुढील प्रमाणे इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिप मुली कॉलेज गट इमानी जाधव( आरटीपीयू) ग्रुप 1 पूजा राऊळ (गोवा) व सुनिधी हलकरे (डी पी एम) ग्रुप 2 वेदा खानोलकर (जी जी चिटणीस) ग्रुप 3 दिशा होंडी (भंडारी स्कूल ) ग्रुप 4 निधी मुचंडी (सेंट मेरीज) ग्रुप 5 रेहा पोरवाल (के एल इ इंटरनॅशनल) ग्रुप 6 रिबेका (हुबळी)
मुले वैयक्तिक चॅम्पियनशिप कॉलेज ग्रुप तनिष्क मोरे( जी एस एस) व दर्शन वरून (अरिहंत ) ग्रुप 1 अमन सूनगार (सेंट पॉल्स ) ग्रुप 2 अनिश पै (के एल इ इंटरनॅशनल) ग्रुप 3 वेदांत मिसाळे (ज्योती सेंट्रल) ग्रुप 4 रक्षित कोरे (लव डेल) ग्रुप 5 अद्वैत जोशी (के एल एस्) ग्रुप 6 अथर्व कमार ( संत मीरा)
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा व हिंद क्लबचे एड.मोहन सप्रे, शितल हुलभत्ते, विश्वास पवार, अमित जाधव, संदीप मोहित, मारुती घाडी, रणजीत पाटील, शिवराज मोहित, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, शितल जाधव, विजया शिरसाठ, गौरी जुवळी प्रसन्ना बसूतकर, श्रीदेवी रोटी, किशोर पाटील, विशाल वेसणे,विजय नाईक, भूषण पवार, अमरनाथ मिलगे, विजय भोगण, भरत पाटील, कल्लाप्पा पाटील, प्रसाद दरवंदर, निखिल बेकने, एड.सुधीर धामणकर एड. संतोष गडकरी, डॉ. सुधीर जोशी, सतीश धनुचे, सुनील जाधव, संतोष अक्की,व संजय कडेमनी, प्रवीण भोसल, वैभव शानबाग, अशुतोष बेळगोजी, ऋषिकेश जाधव, संजय मरगाळे, विनय वेर्णेकर अमर होनगेकर वैभव खानोलकर, पुंडलिक कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
मराठा युवक संघाच्या भव्य अशा जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न सेंट पॉल्स स्कूल ठरला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन.
