सिद्धी विनायक संघाच्यावतीने साबुदाणा खिचडीचा प्रसाद रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून सिद्धीविनायक मंदिर भेंडी बाजार मोतीलाल चौक येथे सेवाभावातून साबुदाणा खिचडीचे प्रसाद वाटप उद्या करण्यात येणार आहे
विशेष म्हणजे, संघाचे खिचडी प्रसाद वाटप करण्याचे यंदाच्या गणेश चतुर्थी निमित्ताने सुरू करण्यात येणार आहे.रविवारी तब्बल 101 किलोचे साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे असे मंडळाचे अध्यक्ष रोहित रावळ यांनी सांगितले.
मोतीलाल चौकातील असलेले व्यापारी वर्गातील गणेश मंदिर श्रध्दास्थान असलेले एकमेव सिद्धी विनायक मंदिर आहे.
गणेश दर्शनासाठी आलेल्या भक्ताच्या मुखात प्रसाद रूपी दोन घास पडावे, गणेशाच्या मंदीरातून कोणीही तसेच जावू नये या विचाराने रोहित रावळ,रमेश भंडारी ,राजू पालीवला,मदन तिवारी, व त्यांच्या सहकाऱ्यांनी दर संकष्टीला सिद्धी विनायक मंदिरात साबुदाणा खिचडी करून गणेश भक्तांना प्रसाद वाटप करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.
रविवारी सकाळी साडे दहा वाजता आरतीला सुरवात होईल,यानंतर 101 किलोचा साबुदाणा प्रसादाचे वाटप केले जाणार आहे तरी गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा