No menu items!
Wednesday, June 4, 2025

विसर्जन मिरवणूक मार्गाची पोलीस आणि अधिकाऱ्यांनी केली पाहणी

Must read

श्रीगणेश उत्सवानिमित्त श्रीगणेश मुर्तींच्या मिरवणूक मार्गाची व विसर्जनाच्या ठिकाणाची जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, श्रीगणेश मंडळाचे पदाधिकारी, नेते व सदस्य यांच्या समवेत पाहणी करण्यात आली.

विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करताना पोलिस अधिकाऱ्यांनी कोणत्या ठिकाणी अडथळा आहे त्याची पाहणी करून अडथळा दूर करण्याचे आश्वासन दिले.

तसेच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा रस्त्यामध्ये पडलेले खड्डे त्वरित बुजवावेत, आणि विद्युत तारांचा स्पर्श विसर्जन मिरवणूक मार्गात गाड्यांना होणार नाही याची खबरदारी घेण्याची विनंती केली.

तसेच विसर्जन तलावाची पाहणी करून कपिलेश्वर तलाव येथील काम लवकरात लवकर हाती घ्यावे अशी सूचना अधिकाऱ्यांनी केली.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!