No menu items!
Tuesday, July 1, 2025

श्री गणेश फेस्टिवल,वऱ्हाड निघाले लंडनला मधून हास्याची मेजवानी

Must read

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पुणे आणि हो, बेळगाव !! या सगळ्या प्रदेशांतल्या भाषांचा आपलाच एक मस्त ठसका आहे. विदर्भ-मराठवाड्यातले लोक पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना पुणे-मुंबई पलीकडे महाराष्ट्र माहित नसतो असं उपहासाने म्हणतात. पण पश्चिम महाराष्ट्रच काय, आख्ख्या जगापर्यंत मराठवाडा आणि मराठवाडी भाषेचा ठसका ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ ने पोचवलाय. लक्ष्मणराव देशपांडेंनी या एकपात्री नाटकाचं लेखन-दिग्दर्शन-अभिनय-कपडेपट हे सगळं एकहाती केलं होतं. यास एकपात्री नाटकाचे सादरीकरण आज मंगळवारी श्री गणेश फेस्टिवल बेळगाव मध्ये करण्यात आले नाट्यकारमी माधव कुंटे यांनी अत्यंत सहज अभिनयातून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. अभिनयासह मध्येच आवाज बदलणं, मध्येच नाक मुरडणं, ब्रिटिश ऍक्सेन्ट की गावच्या वातावरणात फिट्ट बसणारे- हास्याचे फवारे उडवणारे डायलॉग् यामुळे कार्यक्रमाला उपस्थित रसिकांना आज हास्य मेजवानी प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.श्री माता सोसायटीचे व्हाईस चेअरमन संजीव नेगिनहाळ आणि प्रशांत पाटील यांच्या हस्ते माधव कुंटे यांचा सत्कार करण्यात आला. विलास अध्यापक यांनी माधव कुंटे यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी अलका जाधव यांनी आभार व्यक्त केले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!