जीएसएस कॉलेजकडून रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन बेळगाव यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. शालोपयोगी वह्या, पुस्तके जीएसएस कॉलेजकडून क्लबकडे सुपूर्द करण्यात आली. एसकेईचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या हस्ते रोटरीचे अध्यक्ष सतीश नाईक यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. किरण ठाकुर यांनी रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनने चालविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचे काम रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य बी. एल. मजुकर व रोटरीचे सदस्य उपस्थित होते.