भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्सच्या बीकॉम, बीएस्सी व एमकॉम विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पदवीदान सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला आरसीयूच्या साहाय्यक प्राध्यापिका डॉ. अश्विनी जमुनी उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विनोद दोड्डण्णावर होते. डॉ. अश्विनी यांनी विद्यार्थ्यांना ध्येयावर लक्ष देण्याचे आवाहन केले. सध्या भरपूर संधी उपलब्ध असून त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विनोद दोडण्णावर म्हणाले, स्वत:वर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करावे, असे सांगितले. निहा हिरेकोडी, स्वाती शहापूरकर व ज्योती मरगानकोप यांना उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. दिनेश पाटील व श्रेणी हिराप्पाचे यांना उत्कृष्ट क्रीडापटू म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्राचार्या सुनीता देशपांडे यांनी स्वागत केले. सुपर्ण लगमण्णावर यांनी परिचय करून दिला. आयेशा व भावना धर्मादास यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती चडीचाळ यांनी आभार मानले.
भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे निरोप समारंभ उत्साहात
By Akshata Naik
Previous articleरोटरी मिडटाऊनला वह्या-पुस्तके सुपूर्द