मारुती गल्लीतील अध्यापक कुटुंबियांच्या प्राचीन श्री वराह,नरसिंह देवस्थानात श्री वराह जयंती साजरी करण्यात आली.श्री वराह जयंती निमित्त सकाळी पूजा,रुद्राभिषेक करण्यात आला.त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली.मंदिराचे ट्रस्टी विलास अध्यापक आणि आदित्य अध्यापक यांच्या हस्ते अभिषेक आणि आरती करण्यात आली.पूजेचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न नागेश देशपांडे यांनी केले.यावेळी मंदिराचे ट्रस्टी प्रकाश अध्यापक,आनंद अध्यापक,संजीव अध्यापक,श्रीकांत अध्यापक,निरंजन अध्यापक ,सामाजिक कार्यकर्ते सुधीर मोरे उपस्थित होते. वराह जयंती निमित्त दिवसभर भक्तांनी दर्शन घेतले.