महापालिकेचे महसूल उपायुक्त दौड्डगौडर यांना महापालिकेच्या सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता प्रभारी महसूल उपायुक्त म्हणून एम एस बन्सी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी या पदाचा काल पदभार स्वीकारला.
नियमीत महसूल उपायुक्त एस बी दौड्डगौडर हे सध्या रजेवर असून त्यांच्या विरोधात गुरुवारी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. ते दीर्घकालीन रजेवर गेले असल्याने पालिकेच्या सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दौड्डगौडर यांच्या रजेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत तसेच त्यांना महापालिकेतून मुक्त केले जाईपर्यंत महसूल उपायुक्त पदी प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महापालिकेत सध्या बन्सी हे केएएस अधिकारी असल्याने त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांनी घेतला होता बन्सी हे महापालिकेत सध्या काउंसिल सेक्रेटरी पदावर कार्यरत आहे. त्यांच्या निवृत्तीला केवळ चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने त्यांना या पदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता तरीही आयुक्तांनी बन्सी यांना या पदाची जबाबदारी दिली आहे.