दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि स्थानिक पातळीवर जातीवंत वासरांची पैदास व्हावी, याकरिता पशुसंगोपन खात्यामार्फत वासरू प्रदर्शन भरविले जाते. बेळगुंदी येथील पशुसंगोपन दवाखान्याच्या आवारात आज शनिवार दि. १२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत वासरू प्रदर्शन भरविले जाणार आहे. या प्रदर्शन कार्यक्रमाला पशुसंगोपन खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ४ ते १२ महिने वयोगटातील वासरे घेऊन पशुपालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खात्याने केले आहे. बेळगुंदी परिसरातील पशुपालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.
बेळगुंदीत आज वासरू प्रदर्शन
By Akshata Naik

Must read
Previous articleमहाराणा प्रताप यांच्या स्मृतीदिनानिमित्त विशेष लेख !