म्हैसूर दसरा क्रीडा स्पर्धेत बेळगाव डी वाय ई एस स्पोर्ट्स हॉस्टेलच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे या स्पर्धेत बेळगावच्या जुडो खेळाडूंनी सह6 गोल्ड, 1 सिल्व्हर आणि 2 ब्राँझ मेडलची कमाई करत महिला गटात सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आहे
सदर स्पर्धा मैसुरू येथील महाराजा कॉलेज मध्ये 11 ते 15 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आल्या होत्या.स्पर्धेत सहभागी झालेले पदक जिंकलेले खेळाडू ज्युडो कोच रोहिणी पाटील, कुतुजा मुलतानी क्रीडा उपसंचालक श्रीनिवास यांचे
मार्गदर्शन लाभलेले आहे.
या स्पर्धेत 48 किलो वजन गटात श्वेता अलकनुर गोल्ड मेडल, 52 किलो वजन गट दिया पाटील गोल्ड मेडल, रोहिणी पाटील 63 किलो वजन गट गोल्ड मेडल,संजना सेठ 70 किलो गोल्ड मेडल,संध्या चौबे 78 किलो गोल्ड मेडल,प्रकाश येनतेटा 60 किलो गोल्ड मेडल,भूषण वनरासे 81 किलो गोल्ड मेडल,सुमित पाटील 66 किलो वजन गट गोल्ड मेडल,सौरभ पाटील 73 किलो ब्राँझ मेडल.