बेळगाव येथील सकल मराठा समाजाच्यावतीने आज गुरुवार दि. 2 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर बैठकीमध्ये सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन हाती घेतले आहे. त्या आंदोलनासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या बैठकीला बेळगाव परिसरातील सकल मराठा समाजाचे समस्त नेते, कार्यकर्ते, आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. काळ्या दिनाच्या बैठकीत शहर देवस्थान समिती अध्यक्ष आणि शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांनी मराठा समाज बांधवांनी एकत्रित व्हावे असे आवाहन केले आहे.