काल हिंडलगा गणपती मंदिरानजीक अरगन तलावामध्ये सह्याद्री नगर येथील रहिवासी असलेल्या क्रीशा केशवानी व भावीर केशवानी या मायलेकांचा मृतदेह आढळून आला होता. यावेळी या दोघांसोबत क्रिशाचा आणखीन एक मुलगा वीरेन देखील तलावात बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात होता.
दरम्यान काल रात्रीपासून वीरेनचा मृतदेह शोधण्यास शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. दरम्यान आज दुपारी वीरेनचा मृतदेह सापडला असून उत्तरीय तपासणीकरिता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे.
तब्बल चोवीस तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांना यश आले आहे. काल मायलेकाचा मृतदेह सापडल्यानंतर दुसरा मुलगा वीरेन याचा देखील मृतदेह शोधण्याचे काम हाती घेण्यात आले होते .त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम जारी ठेवली होती मात्र आज सकाळपासून अरगन तलावामध्ये उतरून शोध पथकाने मृतदेह शोधण्याचे काम सुरू ठेवले होते दरम्यान दुपारी वीरेनचा मृतदेह हाती लागला आहे