दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा सण
दिवाळी म्हणजे सुख वाटण्याचा सण, दिवाळी म्हणजे अंधार दूर करण्याचा सण . पण आज सुध्दा कित्येक कुटुंबे या आनंदापासून दूरावली आहेत. ऊसतोड कामगार,रस्ते बांधकाम, भंगारगोळा करणारे अशा वंचितांच्या आनंदाच्या सणात वाटेकरी होऊया . या उद्देशाने चंदगड मराठी अध्यापक संघातील गुरूमाऊली व बेळगाव जिल्हातील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या बेळगाव मिडिया असोसिएशनचे पदाधिकारी यांनी भटक्या, वंचित घटकातील लोकांसाठी कपडे व फराळ देण्याचे आवाहन केले आहे. रविवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.वा पाटणे फाटा येथे उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले आहे.