No menu items!
Thursday, November 21, 2024

चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ व बेळगाव मिडीया असोशिएशन यांची वंचितासोबत दिवाळी साजरी

Must read

गुरुजींनी जपली सामाजिक बांधिलकी
चंदगड :
दिवाळी म्हणजे अंधार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा सण. असाच आनंद चंदगङ मराठी अध्यापक संघाच्या वतीने पाटणे फाटा येथील भंगार गोळा करणाऱ्या व हलकर्णी फाटयावरील लमाण समाजासोबत वाटला आहे.
गरीबीच्या पसाऱ्यात त्यांचा जन्म झाला आणि यातच त्यांच्या आयुष्याच्या वाटा निसरटया झाल्या.
आपल्यासाठी कोणीतरी गोड पदार्थ व नवीन कपडे आणलेत ही कल्पनाच त्यांना स्वप्नवत वाटत होती. पण चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाने हे स्वप्न वास्तवात आणले.
भंगारातच आपल्या आयुष्याची दिवाळी साजरी करणाऱ्या पाटणे फाटयावरील कुटुंबासमवेत मराठी अध्यापक संघाने यावर्षीची दिवाळी साजरी केली. येथील प्रत्येक कुटुंबाला फराळ व साडी देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. मुलांना चॉकलेट, बिस्कीटे वाटण्यात आली.
दररोज सकाळी उठून भंगारगोळा करणाऱ्या कुटुंबाला आज एक वेगळाच अनुभव आला.
“वंचिताच्या सोबतचा दिवाळीचा आनंद हा वेगळा आहे. सुसंस्कृत समाजाने यांच्याकडे माणूसकीच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. असे प्रतिपादन
मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष रवि पाटील यांनी केले.
” चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असतो. याच भावनेतून आज भंगारगोळा करणाऱ्या व लमाण कुटुंबातील लोकांसमवेत आम्ही मराठी अध्यापक दिवाळी साजरी करत आहोत. ” असे महादेव शिवणगेकर यांनी मांडले.
शाम लाडलक्ष्मीकार,मारूती लाडलक्ष्मीकार,दिपक लाडलक्ष्मीकार,हुसेन लाडलक्ष्मीकार,शामू लाडलक्ष्मीकार,नागाप्पा लाडलक्ष्मीकार उपस्थित होते.
यावेळी मराठी अध्यापक संघाचे संजय साबळे, एच.आर. पाऊसकर, व्ही.एल. सुतार, , राजेंद्र शिवणगेकर, एस.जे. मोहणगेकर, राहूल नौकुडकर, कु. कोमल शिवणगेकर, बेळगाव मिडिया असोशिएशनचे
श्रीकांत काकतीकर ,शाम मल्लण्णावर,परशराम गुरव,नितिन चौगुले
हे वंचिताच्या दिवाळीच्या आनंदात सहभागी झाले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!