जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) च्या वतीने यंदा दिवाळी झोपडपट्टीमध्ये साजरी करण्यात आली. जायन्ट्सचे अध्यक्ष सुनील मुतकेकर आणि सचिव लक्ष्मण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जायंट्स सदस्यांनी झोपडपट्टीमध्ये जाऊन तेथील रहिवाशांना दीपावलीचा फराळ आणि दिव्यांचे वाटप केले .
बाहेर गावाहून आलेल्या आणि दिवाळी सारख्या सणांची कल्पना नसलेल्या तेथील रहिवाशांना या उपक्रमाचे कौतुक वाटले आणि त्यांनी आनंद साजरा केला. याप्रसंगी जायंट्सचे उपाध्यक्ष अविनाश पाटील, याचबरोबर सदस्य सर्वश्री मदन बामणे पद्मप्रसाद हूली , राजेंद्र जैन,दिगंबर किल्लेकर व इतर सदस्य उपस्थित होते झोपडपट्टीवासीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून जायन्ट्स सभासदांनी समाधान व्यक्त केले