ड्रेनेज लाईन संदर्भातील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महापौर शोभा सोमनाचे यांनी आज गुरुवारी स्वतः अशोकनगर येथे भेट देऊन पाहणी करण्याद्वारे संबंधित समस्येचे तात्काळ निवारण करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला.शहरातील अशोकनगर येथील नागरिकांनी आज महापालिकेत जाऊन महापौर शोभा सोमनाचे यांची भेट घेतली. तसेच आपल्या भागातील ड्रेनेज लाईनमुळे निर्माण झालेल्या समस्ये संदर्भात महापौरांकडे तक्रार करून स्थानिकांना होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. तेंव्हा महापौर सोमनाची ड्रेनेजची समस्या तात्काळ निकालात काढली जाईल असे आश्वासन दिले. फक्त आश्वासन देऊन न थांबता त्यानंतर महापौरांनी समस्येची पाहणी करण्यासाठी थेट अशोकनगर गाठले. त्या ठिकाणी त्यांनी पाहणी दौरा करून ड्रेनेज लाईन समस्या जाणून घेतली. त्याचप्रमाणे सदर समस्या तात्काळ सोडविण्याचा आदेश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. याप्रसंगी त्यांच्या समवेत उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह महापालिकेतील गटनेते, स्थानिक नगरसेवक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. महापौर शोभा सोमनाचे यांनी या पद्धतीने ताबडतोब कार्यवाही केल्यामुळे अशोकनगर येथील रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ड्रेनेज समस्या मार्गी लावण्याचा दिला आदेश
By Akshata Naik
Previous articleजायंट्स तर्फे दिवाळी झोपडपट्टीमध्ये साजरी