सेंट झेवियर्स स्कूलच्या प्राथमिक शालेय मुला-मुलींच्या फुटबॉल संघाने विजापूर येथे झालेल्या बेळगाव विभागीय सार्वजनिक शिक्षण खात्याच्या विभागीय प्राथमिक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करत दुहेरी मुकुट संपादन केले आहे .
बेंगलोर येथील विद्यानगर स्पोर्ट्स (डी वाय एस एस) क्रीडा संकुलनात होणाऱ्या कर्नाटक राज्यस्तरीय सार्वजनिक शिक्षण खात्याच्या प्राथमिक शालेय फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी सेंट झेवियर्स स्कूलचे मुला मुलींचे दोन्ही फुटबॉल संघ बेंगलोरला दाखल झाले आहेत.
नुकत्याच झालेल्या बेळगाव शहर आणि तालुका तसेच जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत एकापेक्षा एक वरचढ असलेल्या संघांना नमून या दोन्ही संघांनी विविध गटात विजेतेपद पटकाविले. सदर दोन्ही संघांना सेंट जेवियर्स स्कूलचे मुख्याध्यापक रेव्हन फादर शीरील ब्रास, क्रीडा शिक्षिका जुलेट फर्नांडिस यांचे प्रोत्साहन तर ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेठ व मानस नायक यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे
14 वर्षा खालील मुले-ऊझर रोटीवाले, समर्थ भंडारी, मोहित पाटील, अजीम तहसीलदार, ओम पुजारी, मोहम्मद माहित भडकली, झैन मुल्ला, नील पाटील, रोशन शहासाहेब, अरखन बडेघर, मामा हजीक अधानी, मोहम्मद रसिल कुंभारी, आरुष चौगुले, मनदीप सिंग गुगलीया, आयुष सिद्धनावर, अंजर पिरजादे, रुद्र पाटील
14 वर्षाखालील मुली
गौरी कलगौडर, श्रद्धा पाटील, मयुरी तिम्मापूर, जान्हवी चव्हाण, अफिफा बडेभाई, प्रांजल हजेरी, श्रावणी सुतार, इफाह अत्तर, तेजल हंसी, विक्षा, उमेहानी पठाण, शांभवी कांगले, सानवी कदम, प्राप्ती कुरणे, गौतमी सिंगनगुडी, खुशी कोळेकर, आयेशा सौदागर, मृणाल वर्पे, आदिती चव्हाण, मारिया मुजावर, हिरोजी यांनी यश संपादन केले आहे