म्हैसूर येथील संदेश अँड ऑक्सिजीन फिटनेस 365 अँड सुपरनोव्हा फिटनेस 365 यांच्यावतीने कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स संघटनेतर्फे येत्या शनिवार दि. 25 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता ‘मि. चामराज वडेयर -2023’ ही कर्नाटक राज्य पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय शरीर सौष्ठव महासंघ मुंबई यांच्या मान्यतेने म्हैसूर येथील दसरा एक्झिबिशन ग्राउंड येथे या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. सदर स्पर्धा 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो, 85 किलो आणि 85 किलो वरील गट अशा एकूण सात गटांमध्ये घेतली जाणार आहे. स्पर्धेतील टायटल विजेत्या स्पर्धकास 30000 रुपये, उपविजेत्यास 15000 रु. आणि बेस्ट पोझर किताब विजेत्यास 5000 रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 4000 रु., 3000 रु., 2000 रु., 1500 रु. व 1000 रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. तरी स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या हौशी शरीर सौष्ठवपटुंनी अधिक माहितीसाठी संदेश (मो. 9900011189) किंवा सुमंथ (मो. 8884888218) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.