No menu items!
Monday, December 23, 2024

शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि जिंकणार — दिपक दळवी

Must read

मा.दीपक दळवी साहेब आमचे प्रेरणा आणि ऊर्जा स्तोत्रधनंजय पाटील

दळवी यांच्या जन्मदिनी युवा कार्यकर्त्यांनी घेतली भेट,दिल्या शुभेच्छा आणि घेतले आशीर्वाद

आज ७ डिसेंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांचा ८२ वा वाढदिवस, याचे औचित्य साधून समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी त्यांचे।अभिष्टचिंतन केले व शुभेच्छा दिल्या तसेच आशीर्वाद ही घेतले, गेल्या वर्षभरापासून दळवी आपल्या तब्बेतीच्या कारणास्तव घरीच आहेत, या ही परिस्थितीत मागीलवर्षी १ नोव्हेंबर २०२२ रोजी काळ्यादिनी सहभाग दर्शवून मराठा मंदिर येथील निषेध सभेला संबोधित केले होते, मधल्या काही आंदोलन मोर्चा मध्येही आपल्या तब्बेतीची हयगय न करता खास करून मुंबई मधील आंदोलना मध्ये सहभाग दर्शविला होता,

यावेळी दिपक दळवी यांनी युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, निवडणूक हा लढ्याचा फक्त एक भाग आहे तर मूळ लढा हा आपल्या सीमाप्रश्नाची सोडवणूक, मराठी अस्मिता, हा आहे, सीमाभागात मराठीची होणारी गळचेपी यासाठी लढा उभारून सतत त्याचा पाठपुरावा करून तो लढा तडीस नेण्यासाठी आपण युवा कार्यकर्त्यांनी नाराज न होता समितीचे कार्य अविरतपणे सुरू ठेवावे असे सांगितले, माझी जरी अडचण झालेली असली तरीही माझ्या डोक्यात सतत या विचाराने नवीन कल्पना सुचत असतात तब्बेतीच्या या अडचणींवर मात करून मी सक्रिय होण्याचा प्रयत्न करेन तो पर्यंत आपण सर्वांनी या लढ्याला पाठबळ द्यावे व हा सीमालढा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे विचार मांडले, तर मध्यवर्तीचे सन्माननीय अध्यक्ष दीपक दळवी साहेब हे आम्हा सीमावासीयांचे सीमालढ्यातील प्रेरणा आणि उर्जा स्तोत्र असून आम्ही त्यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये अविरत कार्यरत राहू, अशी ग्वाही त्यांच्या जन्मदिनी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली, यावेळी धनंजय पाटील यांच्यासह समितीचे युवा कार्यकर्ते किरण हुद्दार,रोहन लंगरकांडे, शिवाजी मेणसे, पत्रकार शेखर पाटील, सुहास हुद्दार इतरांनी भेट घेऊन दळवी यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!