नुकत्याच कर्नाटक राज्य संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या उडपी येथील जलतरण स्पर्धेत तसेच बेंगलोर येथील डायव्हिंग स्पर्धेत आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना चार सुवर्ण सात रौप्य चार कास्य अशी एकूण 15 पदके संपादन केली . या स्पर्धेत प्रथमच घेण्यात आलेल्या स्किल अवॉर्ड टेस्ट मध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान बेळगावच्या दिशा हुंडी हिने मिळविला अशी कामगिरी करणारी दिशा ही बेळगावची पहिली जलतरणपटू ठरली .सविस्तर रिझल्ट पुढील प्रमाणे
जलतरण –कुमारी वेदा खानोलकर हिने मुलींच्या गट क्रमांक दोन मध्ये 50 मीटर बॅकस्ट्रोक व 100 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये दोन रौप्य पदके तसेच 100 मीटर बटरफ्लाय मध्ये एक कास्य पदक संपादन केले .कुमारी दिशा होंडी मुलींच्या गट क्रमांक तीन मध्ये 50 मीटर फ्रीस्टाइल सुवर्ण 200 मीटर आय एम रोप्य तर शंभर मीटर फ्रीस्टाइल कास्यपदक पटकाविले .कुमार श्लोक जाधव याने मुलांच्या गट क्रमांक तीन मध्ये 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकाविले .
डायव्हिंग –कुमार मयुरेश जाधव गट क्रमांक एक मध्ये एक मीटर व तीन मीटर स्प्रिंग बोर्ड ड्रायविंग मध्ये रोप्य पदक संपादन केले .कुमार अर्णव कुलकर्णी गट क्रमांक दोन मध्ये एक मीटर स्प्रिंग बोर्ड सुवर्ण तीन मीटर रौप्य पदक पटकाविले .कुमार युवराज मोहनगेकर याने गट क्रमांक तीन मध्ये वन मीटर स्प्रिंगबोर्ड मध्ये सुवर्ण तर तीन मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये रोप्य पदक संपादन केले .कुमार नील मोहिते गट क्रमांक तीन मध्ये वन मीटर व तीन मीटर स्प्रिंग बोर्ड टाइमिंग मध्ये कांस्यपदक पटकाविले .वरील सर्व जलतरण पटूंची दिनांक 27 ते 29 डिसेंबर रोजी बेंगलोर येथे होणाऱ्या साउथझोन राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात अभिनंदनीय निवड झाली आहे .वरील सर्व जलतरणपटूंना अबा व हिंदी क्लबचे एन आय एस जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार, अमित जाधव शिवराज मोहिते, संदीप मोहिते,रणजीत पाटील, मारुती घाडी यांचे बहुमोल मार्गदर्शन तर आबा क्लबचे चेअरमन एड. मोहन सप्रे अध्यक्ष श्री शितल हुलबत्ते हिंद क्लब चे अध्यक्ष श्री अरविंद संगोळी सौ शुभांगी मंगळूरकर व सतीश धनुचे यांचे प्रोत्साहन लाभते .
राज्य पातळीवरील जलतरण स्पर्धेत दिशा,श्लोक, अर्णव, युवराज यांना सुवर्णपदके
