येथील कंग्राळगल्लीतील वेताळ देवस्थानात कार्तिक पूजोत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.प्रारंभी देवाची पूजा करून ढोल ताशाच्या गजरात आरती झाली.
गल्लीतील महिलांनी दीप व पणती लावून परिसर उजळून टाकला.यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.गल्लीतील पंच मालोजी अष्टेकर, शंकरराव बडवाण्णाचे, अशोक कंग्राळकर, गोपाळ सांबरेकर, बाबुराव कुट्रे, दौलत मोरे,परशुराम दरवंदर, रमेश मोरे ज्येष्ठ नागरिक अनंतरा पाटील, सदानंद बडवाण्णाचे,सुरेश जाधव प्रकाश पाटील, हुरडेकर,पप्पू जाधव, राजेश जाधव उपस्थित होते तसेच गल्लीतील महिला व मुले मोठ्या संख्येने हजर होती.