No menu items!
Thursday, August 28, 2025

आमदार हलगेकर यांचं अभिनंदन तर लक्ष्मण सवदी यांचा जाहीर निषेध

Must read

आपल्या मातृभाषेत मत मांडणे म्हणजे इतर भाषेचा अपमान होत नाही, तर इतर भाषेचा तिरस्कार करणे म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे,
भारतीय लोकशाहीत राज्यघटनेने जे अधिकार घालून दिलेत त्या प्रमाणे प्रत्येक भारतीयाला आपल्या मातृभाषेत आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, मग ती लोकसभा असुदेत किंवा विधानसभा अन्य कुठलही व्यासपीठ.
कर्नाटक विधानसभेच्या बेळगावातील अधिवेशनाचे सूप वाजत असतांना खानापूरचे आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांनी तालुक्यातील मराठी शाळा, तेथील शिक्षकांच्या समस्या, अंगणवाडी शिक्षिकांना केलेली कन्नड सक्ती,अविकसित असलेले रस्ते,तसेच कळसा-भांडुरा प्रकल्पातून खानापूर तालुक्याचं हक्काचं पाणी दुसरीकडे वळवण्यात येतंय ते कदापि होऊ देणार नाही, या बद्दलची स्पष्ट भूमिका आपला मास्तरी बाणा दाखवत आपली मातृभाषा मराठीत मांडली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करीत आहोत,
तर मराठीच्या आकसापोटी लक्ष्मण सवदी यांनी हलगेकर हे मराठीत आपले मत मांडत असतांना त्याचा विरोध केला, लक्ष्मण सवदि यांचा जाहीर निषेध खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!