बेळगाव : दिनांक ८ मार्च रोजी महाशिवरात्र आहे त्यानिमित्ताने बेळगाव शहरांमध्ये सनातन संस्थेतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी सनातन सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ याचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तरी सर्व शिव भक्तांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सनातन संस्थेचे श्री बापू सावंत यांनी केले आहे.
प्रदर्शनाचे ठिकाण आणि वेळ खालील प्रमाणे आहे.
१. श्री कपिलेश्वर मंदिर, शहापूर, बेळगाव
वेळ : सकाळी ८ ते रात्री १०
२. श्री मल्लिकार्जुन मंदिर, वडगाव, बेळगाव
वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ७
३. श्री शिवलिंग मंदिर, महर्षी रोड, बेळगाव
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ७
४. श्री महादेव मंदिर, मांतेश नगर, बेळगाव
वेळ : सकाळी ९:३० ते दुपारी २
५. श्री वैजनाथ मंदिर, देवरवाडी
वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ७
६. श्री कलमेश्वर मंदिर, कंग्राळी.
वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ६
या प्रदर्शनामध्ये विविध सात्त्विक उत्पादने उदाहरणार्थ कुंकू, अत्तर, कापूर, उदबत्ती, अष्टगंध, जपमाळ, देवतांचे फोटो फ्रेम्स इत्यादी आणि विविध अध्यात्मिक, आचार धर्म, बालसंस्कार, आयुर्वेद, आणि राष्ट्र व धर्म या संबंधित ग्रंथ असणार आहेत. त्याचबरोबर एक विशेष शिवकक्ष असणार आहे ज्यावर भगवान शिवाविषयी माहिती देण्यात येणार आहे.
तरी सर्व जिज्ञासूंनी या प्रदर्शनाला भेट देऊन लाभ करून घ्यावा, ही विनंती
श्री. बापू सावंत (७८९२४००१८५)