बैठकीत विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता
बेळगाव : आरोग्य व शिक्षण स्थायी समितीची बैठक बुधवार दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून मागील बैठकीमध्ये ठराव करण्यात आलेल्या इतिवृत्ताला मंजुरी देणे, सार्वजनिक शौचालय नव्याने बांधण्यासाठी निविदा काढणे, याचबरोबर इतर विषयांवर चर्चा या बैठकीत केली जाणार आहे.
अर्थ-कर स्थायी समितीची बैठक उद्या
अर्थ व कर स्थायी समितीची बैठक मंगळवार दि. ५ रोजी होती. मात्र काही कारणास्तव ती बैठक पुढे ढकलण्यात आली असून गुरुवार दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे.